सिंधुदुर्गनगरी :
वेंगुर्ला शहरात डान्टस कॉलनी येथील वार्ड नं. 15, घर क्र. 100 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर, व संतोष गावडे यांचे घरापासून कॅम्प रोडचे डाव्या बाजूस 100 मीटर परिसर बफर झोन दिनांक 11 ऑक्टोबर 2020पर्यंत, कलानगर येथील वार्ड नं. 11, घर क्र. 113 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर, व अनिल वेंगुर्लेकर यांचे घरापर्यंत 100 मीटर परिसर बफर झोन दिनांक 19 ऑक्टोबर 2020पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.