You are currently viewing 10 जुलै रोजी कुडाळ तालुका स्नेहमेळाव्याचे आयोजन

10 जुलै रोजी कुडाळ तालुका स्नेहमेळाव्याचे आयोजन

कुडाळ :

कुडाळ तालुका स्नेहमेळावा 10 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावित्री फातिमा कॅशलेस कुटुंब स्वास्थ्य योजना शुभारंभ व कॅशलेस कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऑपरेशन युनिक हेल्थकेअर अँड मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे संचालक डॉ. नरेंद्र पाटील व तरुण भारतचे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख शेखर सामंत, तर प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे उपाध्यक्ष धनाजी पाटील असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह तथा शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर असणार आहेत.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक भारती कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार, सचिव सुशीलकुमार कडूलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख यज्ञा साळगावकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा