You are currently viewing वैभव नाईक यांनी बेताल बडबड थांबवावी: राजेंद्र म्हापसेकर

वैभव नाईक यांनी बेताल बडबड थांबवावी: राजेंद्र म्हापसेकर

वैभव नाईक यांनी बेताल बडबड करू नये, जनता सुज्ञ आहे. हिम्मत असेल तर आठ दिवसात आयुवेदिक संशोधन केंद्रास आडाळी एमआयडिसी मध्ये जागा उपलब्ध करून द्या. नाहक श्रेया साठी राजकारण नको. आज सिधुदुर्गामध्ये हजारो तरुण तरुणी उच्चदर्जाचे शिक्षण घेऊन बेकार आहेत त्याची लाज तरी बाळगुण हाती आलेला प्रकल्प घालवू नका हि राजकर्त्याना विनंती आहे. केंद्र सरकार ने मंजूर केलेला प्रकल्प हा दोडामार्ग साठी नव्हे तर सिधुदुर्गासाठी छान आहे. श्रेयवादासाठी न झगडता एकत्र या. जेवणासाठी चे ताट मा.श्री श्रीपाद जी नाईक व प्रमोदजी जठार यांनी वाढवून ठेवलेले आहे. ते जेवायच काम आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी कराव. जनतेत संभ्रम होईल अशी बेताल वक्तवे करू नये . मागच्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार कडे जळगाव व सिधुदुर्गासाठी आयुवैदिक संशोधन केंद्र व्हावे यासाठी प्रस्ताव सादर केले होते त्यापेकी आडाळी या ठिकाणी श्रीपाद भाऊ नाईक यांनी खास बाब म्हणून उल्लेख करून महाराष्ट्र सरकार कडे आडाळी एम आयडीसी मध्ये जागा देण्यासाठी मागणी केली यासाठी प्रमोद जठार यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे आयुवैदिक संशोधन केंद्र हे आडाळी या ठिकाणी व्हायला पाहिजे. ठाकरे सरकार जर ते अन्य ठिकाणी पळवण्याचा घाट घालीत असेल तर शिवसेनेच्या आमदार, खासदार याच्या घरासमोर घंटानाद करण्यात येईल. असा इशारा जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, रमेश दळवी, चंदू मळीक, सुधीर दळवी, संतोष नानचे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा