You are currently viewing जाता हाफीसला

जाता हाफीसला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची लावणी रचना

जाता हाफीसला राया जरा मागं वळून बघा
अन येऊन सपनात मला देऊ नका दगा !!धृ!!

निळा शर्ट नि काळा कोट काढला घालाया
वाट बघते मी लाल टाय गळ्यामंधी बांधाया
बूट घालताना पायात तुम्ही नका करू त्रागा
अन् येऊन सपनात मला देऊ नका दगा !!१!!

तुम्ही गेल्यावर कठीण होतंय दिस सरताना
नटूनसजून बसते मी राया तुम्ही घरी येताना
कशी होतेय माझी ही दैना जरा प्रेमाने वागा
अन् येऊन सपनात मला देऊ नका दगा !!२!!

तुमच्या प्रेमात राया बघा मी येडी खुळी झाले
नसता समोर तरी तुमच्या विचारात मी गुंतले
कसा अतूट जुळला आपल्या नात्याचा धागा
अन् येऊन सपनात मला देऊ नका दगा !!३!!

जाता हाफीसला राया जरा मागं वळून बघा
अन् येऊन सपनात मला देऊ नका दगा.

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा