You are currently viewing <strong>जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी</strong><strong></strong>

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी

18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

     

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

 

मुंबई

राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअसे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगडरत्नागिरीसिंधुदुर्गनाशिकजळगावअहमदनगरपुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरऔरंगाबादजालनापरभणीहिंगोलीबीडनांदेडउस्मानाबादलातूरअमरावतीबुलढाणायवतमाळवर्धाचंद्रपूर आणि गडचिरोली.

प्रतिक्रिया व्यक्त करा