You are currently viewing महामार्गाला बाधा नको, मोती तलावाचा कठडा तात्काळ उभारा – सार्वजनिक बांधकामचे सावंतवाडी पालिकेला पत्र

महामार्गाला बाधा नको, मोती तलावाचा कठडा तात्काळ उभारा – सार्वजनिक बांधकामचे सावंतवाडी पालिकेला पत्र

अंदाजे ५० लाखाचा खर्च…

सावंतवाडी

येथील मोती तलावाचा कठडा कोसळल्यामुळे बाजूने जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काम तात्काळ करून घ्या, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने सावंतवाडी नगरपालिकेला दिले आहे. हा कठडा दोन ठिकाणी कोसळला आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी प्रत्येकी २५ असा ५० लाखाचा खर्च आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे,अशी माहीती बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली.
येथील संस्थानकालीन मोती तलावाचा कठडा दोन ठिकाणी कोसळला आहे.अन्य काही ठीकाणी पडझड सुरूच आहे. गाळ हटाव मोहीमेदरम्यान चुकीच्या पद्धतीने माती काढण्यात आल्यामुळे हा कठडा कोसळला. मात्र ही मोहीम राबवताना आवश्यक ती काळजी घेण्यात न आल्यामुळे तब्बल दोन ठिकाणी कोसळला. त्यामुळे फुटपाथ आणि बाजूने जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात यावे,अशा सूचना वजापत्र आपण सावंतवाडी पालिकेला दिले आहे.असे चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी दोन एजन्सी आपण त्यांना सुचविले आहेत. असेही चव्हाण यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा