वेंगुर्ले
शहरातील कॅम्प रामघाटरोड येथील राहिवासी मनोहर उर्फ बाळू परशुराम आडेलकर (५८) यांच्या मृतदेह त्यांच्या घराच्या मागे असलेल्या बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आढळुन आला. याबाबत वेंगुर्ले पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मनोहर आडेलकर यांचे भाऊ उमेश उर्फ बबलू आडेलकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, रविवारी ३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून आपला भाऊ घरी आला नसल्याने त्याच्या पत्नीने सांगितले. यावेळी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेच आढळून आला नाही. दरम्यान मनोहर यांचे टॉवेल हे घराच्या मागे असलेल्या बंद चिरेखाणीच्या ठिकाणी आढळून आले. यावेळी अधिक शोधाशोध केली असता आज ४ जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृतदेह बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आढळून आला. यामुळे आपला भाऊ हा या पाण्यात तोल जाऊन पडून बुडल्याने मयत झाला असल्याची माहिती उमेश आडेलकर यांनी दिली आहे.
दरम्यान चिरेखाण येथील पाण्यात आज दुपारपासून शोधकार्य सुरू केले असता मालवण येथील आपत्कालीन ग्रुपला हा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या शोधकार्यत ओम शिव मोरेश्वर आपत्कालीन ग्रुप मालवणचे वैभव खोबरेकर, योगेश मुळेकर, संतोष मुळेकर, कल्पेश वेंगुर्लेकर, अक्षय मराळ , चेतन मुळेकर, नितेश पराडकर, मोंडकर, गणेश पाडगावकर, वैभव खोबरेकर, महेश शिंदे, शुभम मेस्त्री आदी सहभागी झाले होते. सकाळपासून घटनास्थळी शिवसेनेचे संजय गावडे, परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती दौडशनट्टी, संजय परब, जयेश परब, भूषण अंगाचेकर, विलसेन्ट डिसोजा यांच्यासाहित स्थानिक ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली
दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस सुरेश पाटील, सखाराम परब, गजेंद्र भिसे, दीपा धुरी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.