सिंधुदुर्गनगरी
प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच 5 ते 8 जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.