शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
मालवण (मसुरे) :
मसुरे मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मसूरे येथील रस्ते रस्त्याला गटार नसल्यामुळे पाण्याखाली गेलेले आहे. या सर्वांचा त्रास येथील ग्रामस्थ वाहन चालकांना शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. विशेष करून मसुरे बाजारपेठ ते मसुरे पावनाई मंदिर या रस्त्यावरती एखाद्या छोट्या नदीचे स्वरूप आल्यासारखे वाटत आहे. येथील ग्रामस्थांची दोन्ही बाजूने गटारांची मागणी संबंधित सर्व विभागाकडे धुळखात पडली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शासनाचा प्रचंड निधी खर्च करून हा रस्ता बनविण्यात आला होता परंतु अवघ्या एका महिन्यातच या रस्त्याला गटार नसल्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे पाण्या त गेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.