You are currently viewing योग समिती सिंधुदुर्ग तर्फे बांदा येथे जिल्हास्तरिय भव्य योगशिबीरास मंगळवारपासून प्रारंभ  

योग समिती सिंधुदुर्ग तर्फे बांदा येथे जिल्हास्तरिय भव्य योगशिबीरास मंगळवारपासून प्रारंभ  

बांदा

प . पू . स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे ५ जुलै ते ९ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या आरोग्यासाठी भव्य योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे . हे शिबीर ५ ते ९ जुलै या कालावधीत पहाटे ५.३० ते ७ वा . तसेच ७ व ८ जुलै रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत संपन्न होणार असून सर्व आजारांवर आवश्यक असा अद्ययावत योग , प्राणायाम व आयुर्वेद उपचार यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे , हे शिबीर विनाशुल्क असून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसी अपूर्व सुवर्णसंधी आहे . या शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती , भारत स्वाभिमान , महिला व युवा पतंजलीने केलेले असून आबालवृद्धांसाठी हे शिबीर खुले आहे .
हया शिविरासंबंधी अधिक माहितीसाठी सुदन केसरकर (बांदा) 942206 57 53 वा शेखर बांदेकर ( बांदा ) 88 17 12 यांच्याकडे संपर्क साधावा आणि शिबीर 7823 यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे , असे आवाहन करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा