You are currently viewing बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊतून साकारली फिरती बाग

बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊतून साकारली फिरती बाग

बांदा

जिल्हा परिषद बांदा नं.1 केंद्रशाळेत कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात टाकाऊपासून फिरती बाग साकारली आहे.
दरवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषीदिन म्हणून साजरा येतो .हा दिवस बांदा केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.


शालेय‌ वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेत वर्षभर विविध पर्यावरण पूरक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येते. कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ बॉटल ,डबा, कॅन,बादली,भरणी अशा वस्तू पासून कुंडी तयार करून या कुंडीची सजावट करून ती आकर्षक सजवून आणण्याचे आवाहन केले होते,या उपक्रमाला प्रतिसाद देत शाळेतील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध ‌प्रकारच्या आकर्षक कुंडया बनवून आणल्या व या कुंडया शाळेच्या दर्शनी भागात मांडणी केली.


तसेच या दिवशी शालेय‌ परिसरात 50 रुपये या प्रमाणे एक फुलझाड विकत घेऊन शाळेच्या बागेत लावण्याचे पालक व पर्यावरण प्रेमी यांनी आवाहन केले या उपक्रमालाही पर्यावरण प्रेमींनी प्रतिसाद देत शाळेला अनेक फुलझाडे भेट दिली.बांदा येथील कृषी मंडळ अधिकारी यांनीही 50 सुपारीची रोपे शाळेला भेट दिली. शाळेमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमांसाठी विदयार्थ्यांना शिक्षक व पालक यांचे लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा