वेंगुर्ला (परुळे) :
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने सर्वत्र १ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पंचायत समिती वेंगुर्ला व तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन पर कृषी मेळावा ग्रामपंचायत परुळे बाजार सभागृह येथे घेण्यात आला. यावेळी फळपीक लागवड, खत नियोजन, कीटकनाशक वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
परुळे येथे सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करून आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन म्हणून फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील फळ पीक शास्त्रज्ञ डॉ खापरे, तालुका कृषी अधिकारी एच बी गुंड, परुळे बाजार सरपंच श्वेता चव्हाण, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, चीपी सरपंच गणेश तारी, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, माजी सरपंच प्रदीप प्रभू, महेश सामंत, उपसरपंच मनीष नेवाळकर, कृषी चे विजय घोंगे, एस बी नाईक, कृषी सहाय्यक एस एस पालव, आत्माचे डी एस गोलम, सहायक सीसी रेडकर, कृषी अधिकारी संदेश परब आदी उपस्थित होते. ग्रामसेवक शरद शिंदे, मंगेश नाईक, प्रविण घाडी व परुळे पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.