*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी जी. आर. उर्फ प्रवीण जोशी यांची अप्रतिम लावणी रचना*
*लावणी *( द्वंद्व )*
तो – रूप बिलोरी आरस्पानी
माझ्या सुगंधी फुला
लावू नको आग लावू नको इश्काचा लळा ।। धृ ।।
ती – नुकतेच कुठलं सोळाव सरलं
ज्वानीनी मला पुरतेच घेरलं
तंग अंगावर हिरवी कंचुकी
लागलीया फाटायला
राय तुम्ही अहो सख्या तुम्ही
तुमची म्हणा की मला
तो – हिरवी कच्च तु कोवळी काकडी
बांधवरची शेंग वाकडी
जवळ येता वाढील गोडी
नावं घेता सुटलं ग पाणी
माझ्या ग तोंडाला
राणी ग आता फुलवू इश्कचा मळा
ती – तुझ्याच साठी नटले मी आज
शृंगाराचा चढवुनी साज
सागराचा ऐकुनी गाज
जीव झाला येडा खुळा
तो – घाटावरची अवघड वाट
चढता चढता दुखतीय पाठ
तुझी माझी पडता घाट
कशी उडाली तारंबळा
सजणे ग माझे सखे ग माझे
लावू नको इश्कचा लळा
प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट 1996