You are currently viewing दहा हजार वृक्ष लागवडीचा वेंगुर्ल्यात शुभारंभ

दहा हजार वृक्ष लागवडीचा वेंगुर्ल्यात शुभारंभ

वेंगुर्ला

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज कृषी दिनाच्या निमित्ताने वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करुन करण्यात आला.

या कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे अधिकारी डॉ.केशव देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.विरेंद्र देसाई, प्रा.सुर्यवंशी, प्रा.चुकेवाड, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.वेदिका सावंत व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत आगामी काळात महाविद्यालयामध्ये विविध प्रकारच्या सुमारे दोनशे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.विरेंद्र देसाई व नगरसेवक विधाता सावंत यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा