जिल्हाप्रमुख संजय पडते राहणार उपस्थित
सावंतवाडी
शिवसेना सावंतवाडी शहर कार्यकारणीची बैठक आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आली असून, शहरातील सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपशहर प्रमुख शैलेश गवढळकर व विशाल सावंत यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय पडते महिला आघाडी प्रमुख जानवी सावंत व तालुका प्रमुख रुपेश राऊळ मार्गदर्शन करणार आहेत.