जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी मनीष अहिरे यांची अप्रतिम काव्यरचना
थेंब आले पावसाचे l
कशी आनंदली भुई ll
चाले पेरणी शेतात l
झाली धन्य काळी आई *llधृll*
राजा सरजाची जोड l
ओढी तिफन नांगर ll
बीज लपलं मातीत l
झाली धराई गर्भारं *ll1ll*
औत जुपलं शेतात l
बियं-बियाणं खेळती ll
ओंजळीच्या आळीतुनं l
कसे भुईत पळती *ll2ll*
बाप करतो पेरणी l
घास पोटचा काढुनं ll
जीव भरतो शिवारी l
सुख स्वत:च मारूनं *ll3ll*
फाळ रुतला मातीत l
नांगर करी कुईकुई ll
बाप दंग भजनात l
गाणं देवाजीचं गाई *ll4ll*
वर आभाळात वाजे l
वाजे वरुणाचा ढोल ll
नाद घुंगराची माळ l
म्हणे विठ्ठल विठ्ठल *ll5ll*
अशी किमया बळीची l
तो रं पिकवितो मोती ll
पिकते कष्टामुळे त्याच्या l
अशी मोत्यासम शेती *ll6ll*
*कवी:मनिष आहिरे*
*(नाशिक)*
7588069679