You are currently viewing ग्रामपंचायत नाणोस येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व अंगणवाडी मुलांना छत्रीवाटप

ग्रामपंचायत नाणोस येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व अंगणवाडी मुलांना छत्रीवाटप

सावंतवाडी :

जिल्हा परिषद शाळा नाणोस नं .१ येथे ग्रामपंचायत नाणोस व भुमि ग्रामविकास मंडळ नाणोस यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गावातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार व अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच श्री देव वेतोबा विद्या मंदिर शाळा नाणोस नं. १ चे माजी विद्यार्थी श्री. शशिकांत देऊ जोशी रा. मुंबई- बान्द्रा याच कडुन जिल्हा परिषद शाळा नाणोस नं.१ व शाळा नं. २ , नाणोसकरवाडी व शेटयेवाडी येथील अंगणवाडी मधील सर्व मुलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्याचप्रमाणे जि.प शाळा नं. १ या शाळेसाठी ऑफिसला उपयुक्त साहित्याची पेटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चोडणकर व उपशिक्षक श्री. प्रशांत गुरव यांचेकडे मान्यवरांचे हस्ते सुपूर्त करण्यात आली.

त्यावेळी सरपंच श्री.वासुदेव जोशी, उपसरपंच संजय नाणोसकर , ग्रा.प.सदस्यां विद्या नाणोसकर, शशिकला कांबळी, किशोरी गोडकर, रसिका जोशी, भुमि ग्रामविकास मंडळ चे सदस्य सोनिया शेटये, शंकर शेटये, सानिया शेटये, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर नाणोसकर, श्री देव वेतोबा स्पोर्टस् चे अध्यक्ष उमेश शेटये, सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर, सीआरपी नम्रता नाणोसकर, आशा सेविका उर्मिला तळकर, अनंत शेट्ये, आत्माराम जोशी, मिलिंद नाणोसकर, महिला बचत गटाचे अध्यक्ष व प्रतिनिधी विद्यार्थी आधी उपस्थित होते.

कार्यक्रमा वेळी शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतील मुलांना छत्री वाटप केल्याबद्दल व भेटवस्तू दिल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. चोडणकर यांनी श्री. शशिकांत जोशी यांचे आभार व्यक्त केले. तसेच शाळा नाणोस नंबर २ च्या मुख्याध्यापिका सौ. रूपाली नेवगी, उपशिक्षिका सौ. पुर्वा शेणई, अंगणवाडी मदतनीस सौ. भाग्यश्री नाणोसकर व सौ. सुनीता नाणोसकर यांनी आभार व्यक्त केले.

शाळेतील मुलांची व शाळेची गरज ओळखून छत्री व साहित्यपेटी दिल्याबद्दल श्री. शशिकांत जोशी यांचे ग्रामपंचायत नाणोसच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक श्री. ज्ञानेश कळंगुटकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा