जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांची अप्रतिम काव्यरचना
कशास धरिला हा रुसवा
काय माझे चुकले सांग ना
ह्रदयात तुझी खास जागा
तुला का न कळे सांग ना…
अशी कोणती भेट देऊ
गाली मग फुलती गुलाब
नजरेतली प्रीतीची छटा
नाही का पुरेशी जनाब..?
किती किती समजावले
अजुनी रुसुन आहे.
चल गुंफुनी करी कर
बघ कसा पाऊस झरुन आहे….
एकदा मृगनयन तुझे ऊघड
हा अबोला सखे आता सोड
तुझ्याविना अंधारली चांदणवाट
मिटलेल्या अधरांची घडी ही मोड….
राधिका भांडारकर