मुंबई :
उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे फेसबुक लाईव्ह वरून जाहीर केले आहे. या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्या कार्यकाल याचा आढावा घेतला आणि आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर त्यांनी आपण विधान परिषदेचा ही राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता आमदार म्हणूनही काम करू इच्छित नाहीत.