सिंधुदुर्ग :
पदवीधर पशुवैद्यक शैक्षणिक अहर्ता असल्याचे भासवून पशुवैद्यक व्यवसाय करणाऱ्या बोगस पशुवैद्यकीय व्यवसायिकांना आळा घालण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई व त्यांचा शोध घेऊन शिफारस करण्यासाठी विभागस्तरावर व राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. विभागस्तरावर संबंधित पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त हे अध्यक्ष असणार असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी हे सदस्य तर संबंधित प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन कार्यालयातील सहायक आयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. त्यामुळे बोगस पशुवैद्यकीय व्यवसायिकांना आळा बसणार आहे.