You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील येथील युवा दशावतार कलाकराला पुरस्कार

दोडामार्ग तालुक्यातील येथील युवा दशावतार कलाकराला पुरस्कार

दोडामार्ग :

 

“पुरस्कार प्रेरणा देते, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते” या ब्रीद वाक्याचा अंगीकार करून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रातील रत्नांचा शोध घेऊन त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी व आपल्या क्षेत्रात मोठे होण्यासाठी पुरस्कार देते. असाच पुरस्कार दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील दशावतारात आपले नाव कमावणाऱ्या युवा कलाकार अजिंक्य शिवाजी गवस याला प्राप्त झाला. याचे वितरण दादर येथील माटुंगा सांस्कृतिक सभागृहात या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आकर्षक सन्मानचिन्ह, मानकरी फेटा, मानकरी बेच, गौरव पदक, महावस्त्र, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे यावेळी अजिंक्य गवस आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला.

दोडामार्ग तालुक्यातील एका कंपनीतून दशावतारात स्त्री भूमिका करताना अजिंक्य याचे अभिनय कौशल्य दिसून आले. संवाद, गीत,अभिनय याच बरोबर स्त्री व्यक्तिरेखा साकारताना केली जाणारी वेशभूषा व रंगभूषा हे अजिक्य याचे उजवे विषय ठरले. त्यातूनच त्याने नामांकित कंपनीतुन भूमिका साकारत आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. याचीही दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांनी अजिक्य गवस याला मानाचा पुरस्कार दिला.

अजिंक्य गवस याला हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याचे कला, सांस्कृतिक, राजकीय व सामाजीक क्षेत्रातून अभिनंदन होत असून त्याला भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा