You are currently viewing आरोंदा-कोल्याची भाट येथील खार बंधाऱ्याला भगदाड

आरोंदा-कोल्याची भाट येथील खार बंधाऱ्याला भगदाड

हजारो एकर शेतजमीन खाऱ्यापाण्याखाली तर आसपासच्या परिसरातील घरानांही धोका

सावंतवाडी

आरोंदा येथे वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या खार बंधाऱ्याला भगदाड पडून हजारो एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली गेली आहे..शेतीसोबत आसपासच्या परिसरातील घरानांही याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आरोंदा वाघधरे मुख्य बंधाऱ्यानजीकच्या हा कोल्याची भाट येथिल बंधारा फुटून पाणी शेतात शिरले आहे. सुरुवातीला या बंधाऱ्याला सुमारे दोन मीटर रुंदीचे हे भगदाड पडले होते. मात्र पाऊस सुरु झाल्याने आता तर हे भगदाड वाढतच आहे. त्यामुळे मोठ्या प्रवाहाने पाणी शेत जमिनीत शिरत असल्याचे चित्र आहे.

यामुळे शेतीसोबत आसपासच्या परिसरातील घरानांही धोका निर्माण झाला आहे .याबात आरोंदा सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, आरोंदा ग्रामपंचायतने वेळोवेळी याची कल्पना दिली. तसेच खारभुमी खाते ,वेंगुर्ला यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती दिली. होती मात्र संबंधित खात्याचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर ह्या गोष्टीकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आता हे भगदाड वाढतच आहे. त्यामुळे येथील खार पाणी शेतात घुसून शेत व आजूबाजूच्या घरांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील शेतकरी लवकरात लवकर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा