वेंगुर्ला
चैतन्य विलास दळवी याची सेंट्रल बँक ऑफ इंडिया-नाशिक येथील रिजनल ऑफिसमध्ये विधी अधिकारी (व्यवस्थापक) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा परबवाडा येथे राहत्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टी वेंगुर्लातर्फे सातेरी देवस्थानचे ट्रस्टी रविंद्र परब यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चैतन्य याने प्रतिकूल परिस्थितीत एक आदर्श निर्माण करून परबावाडा गावचे तसेच वेंगुर्ला तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरपंच पपू परब, उपसरपंच हेमंत गावडे, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, माजी सभापती सारिका काळसेकर, माजी सरपंच इनासीन फर्नांडिस, माजी उपसरपंच संतोष सावंत, सायमन आल्मेडा, समीर चिंदरकर, सुनील परब, दशरथ परब, सत्यवान परब, राजन परब, डॉ. बाळू गवंडे, संदीप परब, कांता देसाई, किशोर गवंडे, अजित गवंडे, अमेय शेणई, तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा अंकिता देसाई, अरुणा गवंडे, स्वरा देसाई, कमल केरकर, सीमा देसाई यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. चैतन्य हा परबवाडा गावातील प्रतिष्ठित नागरिक विलास दळवी व जिल्हा न्यायालय ओरोसच्या प्रबंधक चारुता दळवी यांचा मुलगा होय.