You are currently viewing या क्षणानो

या क्षणानो

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांनी श्री.विलास कुलकर्णी यांच्या विवाहाच्या रजत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त लिहिलेलं भावगीत

या क्षणांनो या क्षणी मज सोबतीला या
प्रीतीच्या त्या पाउलांचा नाद घेऊन या ll
जी अनाहुत पाऊलांनी
पहिली अबोली भेट झाली
अंतरी गीतातला ती जणु
अंतरा गाऊन गेली
आज ते स्वर आळवाया कंठात अलगद या….ll

कोठे किनारी वाळूतल्या
त्या मारलेल्या उगीच रेघा
स्पर्श नकळत कळत होता
जशी स्पर्शते ती वीज मेघा
आतां पुन्हा तो सोहळा तुम्ही जागवाया या….ll

घेऊन फेरे जे अग्नी साक्षी उंबरा सखी ओलांडला तू
घाटीकाच ती घट अमृताचा
मम जीवनी की सांडला तू
होऊ कसा उतराई सांगा मार्ग दाखवाया या..ll

दोन तप पूर्तीचा अवघा
मधु काळ मागे लोटला
स्वप्न पूर्तीच्या मिषाने मी
तव हात हाती घेतला
सार्थकाच्या या घडीला तुम्ही दाद देण्या या…ll

पुसता न येती त्या खुणा
घडलो जयांच्या संगती
प्रभुची कृपा रूपे तुझ्या
अक्षय सुखांची साथ ती
दान प्रीतीचे असेच तुम्ही साठवाया या….
या क्षणानो या क्षणी मज सोबतीला या. Ii

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा