विद्यार्थ्यांनी तन-मन धनाने सातत्यपूर्ण अभ्यास केला तर असे विद्यार्थी जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात.
अमरावती
विद्यार्थ्यांनी तन-मन धनाने सातत्यपूर्ण अभ्यास केला तर असे विद्यार्थी जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात .शासनाने सारथी टीआरटीआय बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरघोस मदतीचा हात पुढे केलेला आहे.या सर्व योजनांचा विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा असे प्रतिपादन छत्रपती श्री शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव संसाधन संस्थेचे संचालक श्री डी डी देशमुख यांनी आज अमरावती महानगरपालिकेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील श्री संत गाडगेबाबा अभ्यासिका व ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना काढले .सुरुवातीला डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री डी डी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली .याप्रसंगी श्री डी डी देशमुख यांनी उद्या दिनांक 26 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये होणाऱ्या राजश्री शाहू महाराज जयंती कार्यक्रमाचा तसेच रक्तदान शिबिर व किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाचा संपूर्ण आराखडा सादर केला .या कार्यक्रमामध्ये प्रा.शिवाजी कुचे व सौ.निलिमा काळे यांचे प्रेरणादायी भाषणे होणार आहेत.या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अश्विन चौधरी जिजाऊ सृष्टीचे श्री अरविंद गावंडे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कार्यक्रमाधिकारी श्री अजय साखरे मराठा सेवा संघाचे सचिव श्री संजय ठाकरे व श्री बुट्टे हे उपस्थित होते. या अभ्यासिकेचे प्रमुख व अमरावती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री नरेंद्र वानखडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला .अमरावती शहर विभागात महानगरपालिकेने ठिकाणी अभ्यासिका व ग्रंथालय स्थापन करून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना जी सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. सारथीच्या उपक्रमामध्ये सर्व प्रकारचे प्रशिक्षण विनामूल्य आहेत.26 तारखेच्या या उपक्रमामध्ये अमरावती विभागातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .श्री डी.डी. देशमुख यांचा अमरावती येथे दोन दिवस मुक्काम असून ते अमरावतीच्या विश्राम भवनामध्ये थांबलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सारथीच्या विविध उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी उद्या दिनांक 26 जून रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे .या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहणा-या सर्व विद्यार्थ्यांची अल्पोपहाराची व जलपानाची व्यवस्था सारथीमार्फत करण्यात आली आहे. आज या कार्यक्रमाची उजळणी करण्यात आली असून उद्या तंतोतंत वेळेवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आज त्यांनी नियोजन भवन व डॉ.पंजाबराव देशमुख प्रशासकीय प्रबोधिनी या ठिकाणी भेट देऊन तेथील मुख्य प्रा.पंकज शिरभाते व प्रा. शिवाजी कुचे यांचेशी ही सारथीच्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रकाशनार्थ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 98 90 96 7OO3