कणकवली
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवीमध्ये शिकणाच्या कृषिदूतांचे नांदगाव येथे आगमन झाले. त्यांचे नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वागत केले आहे.
शेतीतील नवीन तंत्रज्ञान, पीक पद्धती, कीड व रोग नियंत्रण व खत व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्या व शेतीची परिस्थिती यावर उपायोजन सुचवणे. स्वागतावेळी सरपंच अफ्रोजा नावलेकर,उपसरपंच नीरज मोरये, व इतर ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी कृषिदूत हर्षवर्धन गायकवाड, आकाश कांबळे ,शुभम देसाई,रोहित लांडगे,श्रीकांत मोहिते,पेद्दगौनी श्रीनाध, छल्ला प्रशांत,नल्लाबोतूल्ला पोलेश्र्वरराव उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मोहिते सर, प्रा.वारे , प्रा.मोठे , प्रा.जंगले , प्रा.शिर्के सर तसेच कृषी विस्तार निरीक्षकांचे मार्गदर्शन लाभले.