You are currently viewing <strong>जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त</strong><strong></strong>

जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त

जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन येत आहे. उद्या रविवार दि. 26 जून जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, शाखा सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज यांच्या संयुक्तपणे जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

               तरुणांना नशेच्या पदार्थांपासून लांब ठेवण्यासाठी नशेच्या विरोधात प्रतीबंधात्मक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि. 26 जून रोजी कणकवली कॉलेज, कणकवली  येथे सकाळी 9 ते 11 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी साडेदहाच्या दरम्यान कणकवली कॉलेज ते आप्पा पटवर्धन चौक जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत जास्तीत जास्त जनतेनी सहभाग घ्यावा असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा