सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिस्कलोजर ऑफ अकौंटिंग पॉलिसीज या विषयावर केले संशोधन
दोडामार्ग
लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक श्रीपाद सुरेश पाडगांवकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची PHD मिळाली आहे. ते हळबे विद्यालयात अकौंटन्सी आणि ऑडिटिंग हा विषय शिकवतात. त्यांनी ए स्टडी ऑफ डिस्कलोजर ऑफ अकौंटिंग पोलिसीज इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या विषयावर आपले संशोधन करताना तसा प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केला होता, याकामी त्यांना डॉ. टी.डी. गुंजाळ,पुणे यांचे मार्गदर्शन मिळाले होते, त्यांनी ही आपली मानाची पदवी आपले आई वडील यांना समर्पित करताना ज्यांचे मार्गदर्शन त्यांना या कामी लाभले त्यांचे आभार मानले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच विविध स्तरातून कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.