You are currently viewing वारी विठ्ठलाची….

वारी विठ्ठलाची….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ. मृदुला कुलकर्णी – खैरनार यांची अप्रतिम अभंग रचना*

*वारी विठ्ठलाची….🚩🚩*

वारी पंढरीची | सावळ्या विठूची |
भेट वैष्णवांची | जिवाभावे || १

खंड तो पडला | नेम ही चुकला |
मनी खंतावला | वारकरी ||२

आता मात्र जावे | रूप ते पहावे |
डोळा साठवावे | भगवंता ||३

हरिनाम घेत | जागर करावा |
गर्जत रहावा | भीमा तीर ||४

भजन कीर्तन | पांडुरंगी ध्यान |
चंद्रभागा स्नान | वाळवंटी ||५

देव भाव पाही | वैष्णव रमतो |
सोहळा सजतो | पंढरीत ||६

चराचरी राहे | व्यापून सकळा |
कैवल्य पुतळा | पांडुरंग ||७

डॉ. मृदुला कुलकर्णी (खैरनार)©
पुणे.
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा