*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांची अप्रतिम काव्यरचना*
*पंढरीची वारी*
(अष्टाक्षरी काव्य)
ज्ञानोबाची तुकियाची
आषाढाच्या पावसात
देहु आळंदी गर्जुन
निघे वारकरी गात…
दिंड्या पताका घेउन
माथी कुंडी तुळशीची
जन वैष्णव नाचती
उरी आस पंढरीची….
वारीमधे नाही भेद
सारे विठ्ठलाचे भक्त
प्रपंचाचे मायापाश
सोडी मागे होई मुक्त….
आभाळात जलधर
वारकरी पाहतसे
पंढरीच्या वारीमधे
सोबतीने चालतसे….
चंद्रभागे तीरी जाती
भक्तजन माउलीचे
पंढरीत दुमदुमे
नाद टाळ मृदुंगाचे……
सौ. राधिका भांडारकर
पुणे