माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख
आज आपल्या सर्वांच्या व पालकांच्या मोठा त्रास देणारा शब्द आहे. रोज आपल्या कोणाला कोणाला या मागणीला हिणवनीला सामोरं जाव लागत. जसं आपण मुलगा मुलगी जन्माला घालून जणू मोठा अपराध केला आहे साताजनमाचया गाठी देवानं बांधल्या आहेत असं आपले पूर्वज म्हणत होतें. ज्याने पाळणा बघितला आहे त्याच्या नशिबात बाशिंग आहेच. पण हे सर्व तथ्य आज कुणीतरी खोट ठरतं आहे . या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे आपले सरकार. शासन व्यवस्था. आणि सर्वात मोठा शाप तो म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य अशी बरिच कारणं आहेत .
मुलगा जन्माला आला आणि सर्व घरदार सगेसोयरे आनंदी झाले. घराला वारस मिळाला. पाच वर्षांचा झाला आणि आई वडील यांनी शाळेत त्याचा दाखला केला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि. मुलगा पुढील शिक्षणासाठी काॅलेज विद्यालय . महाविद्यालय. उच्च शिक्षणासाठी विविध शिक्षण संस्था मध्ये मग त्या अनुदानित असो अथवा विना अनुदानित. अथवा खाजगी शिक्षण संस्था. यामध्ये लाखों रुपये देऊन शिक्षण घेण्यास गेले हे सर्व शिक्षण फुकट झालं नाही त्यासाठी आई वडील शेतात राबले. मोलमजुरी केली. सगेसोयरे यांच्याकडून उसन पैसे घेतले. काही पालकांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी व्याजाने घेतलें. काही जणांनी आपली शेती घर विकून या खाजगी शिक्षण संस्था वाले यांच्या मढयावर पैसे घातले आणि एकावेळ मुलांचे शिक्षण पूर्ण झाले . काहीजणांनी एम पी सी. यु पी सी. याकडे आपला मोर्चा वळविला आणि येथे सुध्दा शिक्षण संस्था यांच्यापेक्षा लुटणारे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण देणारी दुकान तयारच होती. आज प्रत्येक गावात अॅकडमी. तयार झाली त्यांची शिक्षण फी लाखांच्या घरात आणि पालकांना हेच अॅकडमी वाले मोकळी आश्वासन देत आहेत तुमचं पोरग चांगलं आहे पोलिस भरती. सैनिक भरती. तहसिलदार. प्रांताधिकारी. कलेक्टर. क्लास वन अधिकारी होणारच आई वडील यांचं काळीज हळवं आहे. जे आपल्या नशिबाला आल आहे ते आपल्या मुलाच्या आयुष्यात नको . आणि हा विचार करणं वावगं नाही. वडील चोर असेल आपलं पोरगं चोर व्हावं असं कोणालाही वाटणारं नाही. कामगाराचा मुलगा कामगार व्हावा असं कोणत्याही आई वडील यांना वाटणारं नाही . डॉ वकील इंजिनिअर बनून त्याने नोकरी करावी फॅन खाली बसून चाळीस पन्नास हजार पगार घ्यावा आपल्या महतार पणात आपली सेवा करावी त्यांचे लग्न व्हावे मुलंबाळं व्हावी सवताच घर असावं . ही सर्व स्वप्न बघत बघत मुलांचं वय होतं २६/२७ आणि यामध्ये लग्न करायचं राहून जातं कारणं मुलांना आपल्या आई वडील यांच्या कष्टाची जाणीव आहे नोकरी भरती झाल्याशिवाय लग्न करणार नाही असं म्हणणारी मुल मी बघितली आहेत . म्हणून रोजच्या रोज सकाळी रस्त्यावर व्यायाम करणारी मुले. अॅकडमी. अभ्यासिका. यामध्ये आपला अनमोल वेळ आणि घरच्या लोकांच्या स्वप्नासाठी कष्ट करणारी मुलं मी बघितली आहेत.यामधये मुलांचे लग्नाचे वय गेलं
आपलं सरकार निकामी आहे कारणं आज बरिच वर्ष झाली कसलीही भरती नाही . आणि त्यामध्ये सर्वात मोठा शाप म्हणजे आमदार खासदार स्वातंत्र्य सैनिक .व विविध राखीव कोटा . भटक्या विमुक्त जाती. मागासवर्गीय . अनुसूचित जाती. व इतर अशा फसव्या आणि तुमच्या आमच्या मुलांना नोकरी मिळू नये म्हणून आडवा आड फाटा यामुळे आज मुलांची कोंडी निर्माण झाली आहे. वरील विविध अटि शर्ती या़ची पूर्तता सर्वसामान्य पालक करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांना शासकीय निमशासकीय नोकरीत पाहण्याचे त्याचे स्वप्न अधूर राहत आहे . सरकारने कास्ट मधये भारतीची वयोमर्यादा ३० चे पुढं वाढवली आहे आणि ओपन मध्ये २६/२७ केली आहे. म्हणजे मुलांचे शिक्षण आणि विविध अभ्यास करण्यात त्यांचे वय निघून जातय आणि जर त्यातूनच भरतीचे वय निघून गेले की मुलांच्या वर आभाळ कोसळतय कारणं अभ्यास आणि नुस्ता अभ्यास करणारी मुलं यांना कष्टाची सवय नाही मिळेल ते काम करण्याची तयारी नाही. शिक्षण जास्त झालय म्हणून पडेल ते काम करण्याची लाज वाटते. आणि आपल्याला रोजच बातम्या येत आहेत . विद्यार्थी आत्महत्या सारखे प्रकार कायमचं घडत आहेत. यांत त्या आई वडील यांचा काय दोष आहे त्यांनी सवता उपाशी राहून शिकवलं आणि नोकरी नाही वय वाढलं म्हणून कोण मुलगी देत नाही या मानसिक त्रासाला कंटाळून जे पोरगं आत्महत्या करत म्हणजे त्या आई वडील यांचेवर आभाळच कोसळत काय वाईट आहे सर्व प्रकार
मुलांच्या लग्नासाठी आई वडील सगेसोयरे यांची मुलगी शोधाशोध सुरू होतें. पण आजच्या मुलींची मागणी असते मुलगा सरकारी नोकरीत पाहिजे. आई वडील यांना एकटा पाहिजे. शेती नको. बहिण भाऊ नको. वेगळ राजा राणी सारखं राह्यलं पाहिजे. बंगाला गाडी नोकर चाकर घरांत घरकाम करायला बाई पोरं सांभाळायला बाई पाहिजे. पैसा बॅंक बॅलन्स पाहिजे. महागडी कपडे महागडं मोबाईल.हाॅटल माॅल मध्ये फिरणं . अशा एक नाही अनेक मागण्या आज मुलीच्या वाढल्या आहेत. त्याला कारणीभूत आहेत ते मुलींचे आई वडील आणि एक खुळी समजूत मुलीच्या पालकांच्या मनात आहे की मुलींची संख्या कमी आहे पण चुकीचे आहे आपणं आपला गोतावळा कधी सोडला नाही मुलांच्या पालकांनी जरा बाहेर पडा मुलींची संख्या जास्त आहे असं आपल्या ध्यानात येईल . मुलगीच या पालकांना मी सांगू इच्छितो की आज तुम्ही मुलगा निर्व्यसनी आहे सरकारी नोकरीत आहे शेती आहे बंगला आहे .पैसा आहे आणि त्या मुलाची वेळ खराब आली आणि मुलगा दारुडा. जुगारी. सगळी व्यसनी करणारा मिळाला तर आपल्या मुलीच्या भविष्याचे काय मग आपणं म्हणतो ते तीझ नशिब. त्यात आमचा काय दोष. म्हणजे चांगले केलं देवानं केल आणि वाईट झाल तर माणसानं केल ही आपली मानसिकता असतें.
“” पोरगं काय करतंय “” ही विचारणा जेव्हा तुम्ही करता त्यावेळी समाजात अशी काही मुलं आहेत की शिकून नोकरीची वाट न पाहता आपल्या कुटुंबाची आणि आपल्या उदरनिर्वाह. कुटुंबातील बिकट परिस्थिती. बॅंका पतसंस्था यांच कर्ज यासाठी मिळेल ते काम मिळेल ती मजूरी करुन आपल्या कुटुंबाचा आई वडील बहीण भाऊ यांचा संभाळ करणारी मुलं सुध्दा आज आपल्या समाजात एक आदर्श घेण्यासारखे काम करणारे आहेत गरज आहे आपणं त्यांच्या अंगातील गुणवत्ता पारखणयाची पण ती आपली मानसिकता नाही. उंडगी उणाड मुल यांची लग्न झाली काही मुलींनी पळून जाऊन लग्न केली पण खरोखरच आदर्श आणि कष्टाळू मुलाची लग्न झालीच नाहीत त्यांना मुलींचे पालक विचारतात पोरगं काय करतंय काय भयानक प्रकार आहे बघा . मुलीला काय पाहिजे आई वडील यांच्यासारखे सासू सासरे. लाड पुरविणारा नवरा. दोन वेळ कष्टाची मिळवलेली पोटभर भाकरी. डोक्यावर सवताच हक्काचं साधं का होईना पण छप्पर. अंगाला अंगभर कपडे. समाजात आणि घरांत मानसन्मान . पैसा संपत्ती काही बरोबर जाणार नाही एवढं असलतरी बास . जगायला आणि आनंदी राहायला यापेक्षा काय वेगळ पाहिजे. पाहिजे ती आपली मनाची शांतता आणि माणूस पारखणयाची शक्ति ती देवाने प्रत्येकात दिलेली आहे .
वधू-वर सूचक या सर्व प्रकारांचा पुरेपूर फायदा उचलणारे एक मोठ षडयंत्र आहे ज्या मुलांची . मुलींची लग्न जमतं नाहीत ते या वधू-वर सूचक केंद्राच्या जाळ्यात सापडतात आणि हजारों रूपये भरून फसतात . वधू-वर सूचक वाले मुलाला मुलगी दाखविण्यासाठी पर मुलगी असा चार्ज लावत आहेत. जेवण येण जाण . राहणे. हा सर्व खर्च मुलांचे पालक यांच्या डोक्यावर असतो . पैसा घालून पुरते बेजार होतात मुला मुलींचे पालक आणि हा सर्व प्रकार बघून मुलांना भलताच मानसिक त्रास होतो आणि मुल मुली लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकतात .
वधू-वर सूचक केंद्र सर्वजण काही फक्त आणि फक्त पैसा मिळविण्याच्या हेतूने काम करतं नाहीत काही ठिकाणी असं सुद्धा माझ्या पाहण्यात आल आहे काही वधू-वर सूचक केंद्रातील मंडळी फक्त जनसेवा म्हणून मुला मुलीची लग्न मोफत जमवतात व वेळ पडल्यास मोफत सामुहिक विवाह सुध्दा करून देतात पण असे लोक आणि वधू-वर सूचक केंद्र वाले कमी आहेत असे सर्वजण वागले तर कोणताही मुलींचा पालक पोरगं काय करतंय म्हणून विचारणार नाही आणि सर्वजण आपल्या आपल्या जोडीदाराच्या सोबत एक आनंदी जीवन जगातील
विचार करा जीवन बदलेल.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९