सिंधुदुर्गनगरी
भारतीय डाक विभागगमार्फत या वर्षी ‘ढाई आखर’ राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा विषय ‘2047 सालीचा भारत‘ हे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. स्पर्धा खुली असून 18 वर्षापर्यंत व 18 वर्षावरील अशा दोन गटात होईल. पोस्ट लिफाफा , साध्या लिफाफ्यामधून आवश्यक तिकीट लावून ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 100 शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्ती जास्त 500 शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर, आंतर्देशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा, आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस ढाई आखर राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे स्पर्धकांनी हे पत्र ,चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 40001 या पत्यावर दि. 31/10/2022 पर्यंत पाठवावीत.
महाराष्ट्र मंडळ स्तरावरली निवडक पहिल्या 3 पत्रांना गटा प्रमाणे प्रथम क्र. 25 हजार रुपये. व्दितीय क्र. 10 हजार रुपये, तृतीय क्र. 5 हजार रुपये चे पारितोषिक दिले जाईल. मंडळ स्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्र राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमांकाच्या पत्राना अनुक्रमे 50 हजार रूपये, 25 हजार रुपये व 10 हजार रुपये अशी पारितोषिक दिली जातील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक जी जनार्दना रेड्डी यांनी केले आहे.