वेंगुर्ले
विधानपरिषदेवर भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्याने आज २१ जूनला वेंगुर्ले तालुका भाजपच्या वतीने तालुका कार्यालया समोर मिठाई वाटून व भाजपच्या विजयाच्या घोषणाबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या निवडणुकीचे किंगमेकर ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले तसेच ॲड. सुषमा खानोलकर, हेमंत गावडे, रवींद्र शिरसाट, शंकर घारे, भूषण सारंग, सुधीर गोरे, जयवंत तुळसकर, धैर्यशील टाककर, महादेव नाईक, लक्ष्मीकांत कर्पे, आकांक्षा परब, रसिका मटकर, समीर चिंदरकर, संतोष शेटकर, चंद्रकांत पवार, सुनील घाग, वासुदेव पांगम, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, प्रार्थना हळदणकर, पुंडलिक हळदणकर, श्यामसंदर मुंणगेकर, शेखर काणेकर, प्रशांत आपटे, रफिक शेख, साक्षी पेडणेकर, राधाकृष्ण सावंत यांच्या सह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.