जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी एकनाथ गायकवाड यांची अप्रतिम काव्यरचना
आषाढाची रात आणि पावसाला जोर
कडाडते वीज नभी मना लागे घोर
ताशा टिपर्यांचा ताल कौलराच्या वर
झाडांतून येती मेघमल्हाराचे स्वर
किर्र किर्र रातकीडा काळोखाच्या डोली
मनातल्या भितीची तो वाढवितो खोली
अंधारात चमकतो काजव्यांचा थवा
रातीलाही आपोआप रंग येतो नवा
मनी अशी विसावली पावसाळी रात
भरून राहिली कशी काळजाच्या आत
श्री. एकनाथ गायकवाड
मु.पो.त्रिंबक
ता.मालवण
जि.सिंधुदुर्ग
पिन.416614
मो.नं.9421182337