फ़ोर्टीस हॉस्पिटलमध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शन :
तळेरे: प्रतिनिधी
निकेतने जोपासलेले अक्षर आणि विचारधन सर्वार्थाने महत्वाचे आहे. त्याचा हा अक्षरोत्सव म्हणजे अनेक व्यक्तींना एकत्र आणून केलेला महोत्सव आहे. अत्यंत सुंदर पध्दतीने जपलेल्या या ठेव्याला भविष्यात खुप महत्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन सुप्रसिध्द गायक शाहिर नंदेश उमप यांनी केले. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटल मध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर गायक नंदेश उमप आणि अर्जुन पुरस्कार विजेती मल्लखांब खेळाडू हिमानी परब यांच्या हस्ते फित सोडून करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर म्हस्कर, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू सचिन म्हस्कर, प्रसिध्द ध्वनीमुद्रक किट्टू म्याकल, इंटरनॅशनल फुटबाॅल खेळाडू जयेश राणे, फ़ोर्टीस हॉस्पिटलचे रक्तपेढी प्रमुख ललित धनतोळे, डॉ. मनजित सिंग अरोरा, वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. मनिषा पाठक, वितरण प्रमुख रिन्कू मावनी, कम्युनिटी प्रमुख अविनाश वाघमारे, अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर आदी उपस्थित होते.
फ़ोर्टीस हॉस्पिटल आणि द्रौपदी क्रिएशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनामध्ये विविध व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
*”अक्षरोत्सव” ला मान्यवरांच्या भेटी* (चौकट)
दिवसभर चाललेल्या या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रसिध्द कवी सतिश मोघे, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, अभिनेते शशिकांत खानविलकर, प्रसिध्द चित्रकार किशोर नादावडेकर, पत्रकार किशोर गावडे, कोकण महोत्सवाचे संयोजक सुजय धुरत, ॲड. सुनिल देवकर, अभिनेते शेखर फडके, तिमिरातून तेजाकडे उपक्रमाचे प्रमुख सत्यवान रेडकर, सुलेखनकार श्रीकांत गवंडे, उमेश शिंदे, सुधाकर नर, पालवी फाऊंडेशनचे गणेश जाधव, दादर पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी बाळा चौकेकर, मंगेश शेट्ये, पत्रकार विनायक सुतार यांच्यासह अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांमधून नंदेश उमप, सचिन म्हस्कर, किट्टू म्याकल, सिध्दि परब यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरासोबत सांगितिक कार्यक्रम आणि अक्षरोत्सव प्रदर्शन असा त्रिवेणी संगम असलेला आगळ्यावेगळया प्रकारचा कार्यक्रम आयोजित करुन फ़ोर्टीस हॉस्पिटलने वेगळेपण दाखवून दिले.
यावेळी मनोज कोट्क, मेघाली कोरगावकर म्हस्कर, सचिन म्हस्कर, जयेश राणे, हिमानी परब, निकेत पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फ़ोर्टीस हॉस्पिटलचे कम्युनिटी प्रमुख अविनाश वाघमारे आणि संपुर्ण व्यवस्थापन, द्रौपदी क्रिएशनचे प्रणय शेट्ये आणि संपूर्ण व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले.
1. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटल मध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शन पाहताना कवी, वरिष्ठ अधिकारी सतिश मोघे, प्रसिध्द चित्रकार किशोर नादावडेकर दिसत आहेत.
2. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटल मध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शनाला अभिनेते शेखर फडके यांनी सदिच्छा भेट दिली.
3. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटल मध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शनाला माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या.
4. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटल मध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शनाला अभिनेते शशिकांत खानविलकर, वरिष्ठ अधिकारी कवी सतिश मोघे, चित्रकार किशोर नादावडेकर, सत्यवान रेडकर, सुलेखनकार श्रीकांत गवंडे, उमेश शिंदे, पालवी फाऊंडेशनचे गणेश जाधव, दादर पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी बाळा चौकेकर, मंगेश शेट्ये, संगीतकार गीतकार प्रणय शेट्ये आदीनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.