You are currently viewing शिक्षण व सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व विकासभाई सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

शिक्षण व सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व विकासभाई सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

काँग्रेसचे जेष्ठ नेते सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे पुत्र विकास सावंत यांचा आज वाढदिवस. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण आणि सहकारातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले विकास सावंत शिक्षण क्षेत्रातही आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कुल आणि महाविद्यालय हे गेली अनेक वर्षे ते सावंतवाडीत चालवीत आहेत. तसेच शांतिनिकेतन इंग्रजी माध्यमाची शाळा सावंतवाडीत सुरू केली असून दोडामार्ग मध्येही ते इंग्रजी माध्यमाची शाळा ज्युनिअर कॉलेज सुरू केले असून चौकुळ येथे चौकुळ इंग्लिश स्कूल चालवीत आहेत. तालुक्यातील मुलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. सावंतवाडीतील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा ते मदत करत असतात. गेल्या काही वर्षात महाविद्यालयाचा विस्तार करून संस्थेची उत्तम प्रगती साधली आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या संस्था, चळवळ, स्नेहसंमेलन, काव्यसम्मेलन आदींसाठी विकास भाईंकडून मोफत अथवा नाममात्र फी आकारून हॉल देखील उपलब्ध करून दिला जातो.
सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मध्येही सदस्य आरोग्य व शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. जिल्हापरिषदेवर शिवसेनेची पहिल्यांदाच सत्ता आली तेव्हा विरोधी सदस्य असूनही शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. जिल्हा बँकेवरही त्यांनी अभ्यासू संचालक म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात, राष्ट्रवादीत त्यांना येण्यासाठीही आग्रह करण्यात आला होता. राष्ट्रवादीतून त्यांना विधानसभेचीही ऑफर देण्यात आली होती तेव्हा काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांनी ती नाकारली. विधानसभा उमेदवार म्हणून काँग्रेसची त्यांना उमेदवारी मिळाली होती. नैतिकतेमुळे बदलत्या राजकारणात त्यांचा प्रभाव पडला नाही. जिल्हा नियोजनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
काँग्रेसच्या पडत्या काळात विकास सावंत यांनी पक्ष सावरला, पक्षानेही जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती.
विकास सावंत यांचा आज जन्मदिवस… *संवाद मिडियाकडून विकास सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा