You are currently viewing सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग कार्यकारणी जाहीर

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान दोडामार्ग कार्यकारणी जाहीर

अध्यक्ष पदी विवेकानंद नाईक तर सचिव पदी संतोष सातार्डेकर

दोडामार्ग

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण गवस, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्या उपस्थितीत सुशिला हाँल, दोडामार्ग येथे बैठक पार पडली. त्यावेळी  दोडामार्ग शाखेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

त्यात अध्यक्ष-विवेकानंद नाईक, उपाध्यक्ष – जयवंत तुळसकर व सौ.गीतांजली संतोष सातार्डेकर, सचिव-संतोष सातार्डेकर, सहसचिव – वैभव रेडकर, खजिनदार-अजित देसाई, सहखजिनदार-रामचंद्र ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख -भूषण सावंत, संपर्क प्रमुख – अजित सावंत, महिला संघटक – सौ.डॉ. पूजा विराज नाईक, कार्यक्रम व्यवस्थापक- मनोज वझे व साईराज राणे, दशक्रोशी प्रमुख – गोविंद गवस व रामकृष्ण दळवी, तर सदस्य पदी – रजत प्रसादी यांची निवड करण्यात आली.

यावेळी दोडामार्ग अध्यक्षपदी विवेकानंद नाईक यांची निवड झाल्याने जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण गवस, सावंतवाडी-दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा