You are currently viewing MNGL च्या हलगर्जीपणा मुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले…

MNGL च्या हलगर्जीपणा मुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले…

बांधकाम विभागाला जाब विचारणार ; चेतन चव्हाण

मणेरीतील अपघात याच कारणामुळे, जीवितहानी झाल्यास बांधकाम विभाग जबाबदारी घेणार काय? : विचारला सवाल

दोडामार्ग

तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था सुधारत असताना MNGL या गेस पाईप लाईन टाकणाऱ्या कंपनीने रस्ता साईडपट्टी खोदल्याने ऐन पावसाळ्यात रस्ते खचत आहेत, मणेरी येथे असाच रस्ता खचला असून त्याठिकाणी बांधकामने बेरल उभे करून रस्ता धोकादायक असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र त्याच ठिकाणी आज अपघात घडला व त्यात दोन जण जायबंदी झाले, याला बांधकाम विभागच जबाबदार असून जीवितहानी झाल्यास बांधकाम विभाग जबाबदारी घेणार का असा सवाल करत सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराओ घालण्याचा इशारा कसई दोडामार्ग चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा