*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे यांची अप्रतिम काव्यरचना*
*बाप हा बाप असतो*
घराचा आधारस्तंभ व तलवारीची ढाल होतो,
तो असतो बाप.
बोटाला धरुन चालायला शिकवतो
जिंकून हरतो .
तो असतो बाप.
दुःखाशी दोन हात करून,
आपली स्वप्न पूर्ण करतो.
तो असतो बाप.
आपल्याला चांगले कपडे मिळावे म्हणून फाटके धोतर घालतो.
तो असतो बाप .
आकाशातला सुर्य,
व रात्रीचा चंद्र असतो.
तो असतो बाप
आपल्या सुखासाठी
पाणी करणारा ,
अनंत चुका पोटात घेणारा,
समुद्र होतो.
तो असतो बाप.
वरुन टणक रागिट असला तरी
आतून मायेचा झरा असतो.
तो असतो बाप.
स्वतः च्या ईच्छा मारून आपल्या ईच्छा पुर्ण करणारा देव असतो.
तो असतो बाप.
आपल्या दुःखात मनात झुरतो,
आणि आनंदासाठी आपल्या ,राब राब राबतो.
तो असतो बाप.
बापाचा धाक म्हणजे शिस्त
लावणे हेतू असतो.
तो असतो बाप.
उन्हात राब राब राबतो व
संकटात वटवृक्षासारखा ठाम उभा राहतो .
तो असतो बाप.
चिमटा मारून पोटाला,
घास आपल्याला भरवतो
तो असतो बाप.
घराचा अधारस्थंभ कर्तव्य पुर्ण
दक्ष ,असतो.
तो असतो बाप.
ओलांडून साठी ,
हातात काठी.
शब्दाचा अधार असतो.
तो असतो बाप.
जन्मदात्याचे उपकार अनंत.
कातडीचे जोडवी केली तरी ,
उपकार त्यांचे फिटणार नाही.
असा बाप होणे आपल्याला कधी
जमणार नाही.
एक दोन लिहताना ,
हात आपला वळत नाही.
बाप झाल्याशिवाय
बाप कळत नाही.
भारती वाघमारे
🪴🪴🙏🏻🪴🪴