You are currently viewing तूझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर

तूझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना*

*तूझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर*

तूझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर
सत्याहुनही स्वप्नच सुंदर

भेट तुझी ती कधि एकांती
चोरुनी सर्व जगाला प्रीती
भिंतीची पण त्यातुन भीती
नकळे यातच कसली नीती
या सर्वातुन मुक्त खरोखर तुझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर

क्षणी येऊनी क्षणात जाशी
सदैव राहे हीच मनाशी
लाज आड ये तूझ्या बावरी
बांधुनी ती मी फिरे उरी
प्रीतीचे उत्कट प्रत्यन्तर तुझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर

हसशील रडशिल भाव बदलता
रुसशिल फुगशिल डाव खेळता
निर्वीकार परि राहिलं प्रतिमा
सदैव हंसरी कधीही बघता
मूर्त तुझी अन माझा ईश्वर तुझ्याहुनी तव प्रतिमा सुंदर

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा