You are currently viewing हमी

हमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांची अप्रतिम काव्यरचना*

*💑💑हमी👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨*

आयुष्यात जेव्हा आपले, तुझे माझे होते।
तेथूनच सगळ्यांना मग, शब्दांचे ओझे होते।।

तुटलेल्या नात्यांची कोणी, हमी घेणार नाही।
मनातील वादळ माझ्या, शांत होणार नाही।।

तुझ्या माझ्या वादामध्ये, काया होते निकामी।
आनंदाची जागा जगी, राहून गेली रिकामी।।

ओलावा जप नात्यातला, नको ठेवू कोरी घागर।
शोध जरा भावतली, आहे सुखाचा सागर।।

द्वेषाच्या जीर्ण पदराला, धागा कोणी देणार का?।
नात्यांची फाटकी गोधडी, पुन्हा शिवून घेणार का?।।

आपला स्वार्थ सोडून, दुसऱ्यासाठी जगा।
मिसळून राहा असे, जसा सुईत आहे धागा।।

रामदास आण्णा
गाव: श्री चक्रधर स्वामी तीर्थक्षेत्र मासरूळ
जिल्हा : बुलडाणा
सम्पर्क: ७९८७७८६३७३

प्रतिक्रिया व्यक्त करा