कुडाळ :
तालुक्यातील MCL कंपनी अंतर्गत “श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड” यांच्या मार्फत “पेड लागाओ धरती बचाओ” अभियान निवजे (कुडाळ) गावामध्ये राबविण्यात आले. यावेळी श्री एकदंत प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक प्रज्ञा सत्यविजय भैरे व प्रशांत भालेराव तसेच संचालक रुपेश (बाबी) जाधव, यशवंत सावंत, आत्माराम गवळी, विठ्ठल पालव, धनंजय सावंत, उदय सावंत, पिंटू राऊळ, निवजे गावचे प्रगतील शेतकरी, तसेच निवजेश्वर दुग्ध उत्पादक दुध डेरी निवजे चे सचिव अभय परब, निवजे विकास सोसायटीचे सचिव विष्णू परब, प्रगतील शेतकरी महादेव परब, ग्रामस्थ व प्रगतील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तेथील ग्रामस्थांना प्रत्येकाने किमान एक तरी झाडं घराजवळ किंवा उपलब्ध जागेत लावावे व त्याचे मनापासून संगोपन करावे, शिवाय सजीव सृष्टीचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल, तर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला दुसरा पर्याय नाही. झाडांचं मूल्य समजून घ्या. आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर, डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. तसेच झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात, असा संदेश देण्यात आला.