कुडाळ :
MCL कंपनी अंतर्गत “श्री एकदंत प्रोड्युसर कंपनी लिमिटेड – कुडाळ” यांच्या मार्फत “पेड लागाओ धरती बचाओ” अभियानाची सुरवात गोठोस (कुडाळ) येथे झाली. या अभियानाला कंपनीचे संस्थापक प्रज्ञा सत्यविजय भैरे व प्रशांत भालेराव तसेच संचालक विष्णू तमाणेकर, रुपेश (बाबी) जाधव तसेच आदित्य तमाणेकर, रमेश धुरी, नाना कदम, तुकाराम नाईक , प्रकाश कदम, भाई सावंत,पांडुरंग पवार उपस्थित होते. विशेतः या अभियानाला झाडे पुरवणारे श्री महेंद्र देशमुख (फॉरेस्ट गार्ड) यांचे सहकार्य लाभले.
तर गोठोस गावचे भविष्य घडवणारी शाळेची लाडकी मुले यांनी पण आपली हजेरी लावली. प्रत्येकाने किमान एक तरी झाडं घराजवळ किंवा उपलब्ध जागेत लावावे व त्याचे मनापासून संगोपन करावे. शिवाय सजीव सृष्टीचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल, तर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला दुसरा पर्याय नाही.
झाडांचं मूल्य समजून घ्या. आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर, डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. तसेच झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.
मुलांना झाडे लावण्याची व संगोपन करण्याची आवड निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक जागृत करणे असा दुहेरी उद्देश अभियानातून राबविण्यात आला.