You are currently viewing जगातली पहिलीच कोरोना नेझल वॅक्सिन लवकरच येणार; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण

जगातली पहिलीच कोरोना नेझल वॅक्सिन लवकरच येणार; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण

 

जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र अद्याप कोरोनावरील पूर्ण उपचार सापडलेला नाही. आता लवकरच कोरोनाची नेझल वॅक्सिन (Nasal Vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणारी लस येणार आहे. भारत बायोटेकचे (Bharat Biotech) अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नेझल वॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात कंपनी नेझल वॅक्सिनची माहिती भारतीय औषध नियामक मंडळाकडे (DGCI) सादर करेल.

डॉ. एला यांनी पुढे सांगितलं की, ‘आम्ही सध्या नेझल वॅक्सिनची एक चाचणी पूर्ण केली असून सध्या माहितीचं विश्लेषण सुरु आहे. पुढील महिन्यात यासंदर्भातील माहिती DGCI सुपुर्द करण्यात येईल. सर्व योग्य प्रकारे झाल्या DGCIकडून या लसीले परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या लसीला मान्यता मिळाल्यास ही जगातील पहिली नेझल वॅक्सिन ठरेल.’

पॅरिसमध्ये डॉ. एला यांनी व्हिवा टेक्नॉलॉजी 2022 च्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. यावेळी त्यांनी नेझल वॅक्सिन संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे त्यांनी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने या वर्षी जानेवारीमध्ये भारत बायोटेकला नेझल वॅक्सिनवरील तिसऱ्या चाचणीसाठी परवानगी दिली.

त्यांनी सांगितलं की, कोरोना लसीचा बूस्टर डोस रोग प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्यामुळे बूस्टर डोस हा प्रत्येक लसीकरणासाठी चमत्कारिक डोस असतो. मुलांमध्येही दोन डोस जास्त प्रतिकारशक्ती देत ​​नाहीत, परंतु बूस्टर डोस मुलांसाठी खूप प्रभावी आहे.

प्रौढांसाठी देखील कोरोना लसीचा बूस्टर डोस खूप महत्वाचा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, कोरोना विषाणूला 100 टक्के नष्ट करता येणार नाही. तो कायम असेल आणि आपल्याला त्याच्यासोबत जगावे लागेल आणि त्यापासून स्वत:चं संरक्षण करावं लागेल आणि कोरोना संसर्ग नियंत्रित करावा लागेल

प्रतिक्रिया व्यक्त करा