You are currently viewing जिज़ामाता

जिज़ामाता

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्य सम्राट कवी मिर्झा रफि अहमद बेग उर्फ मिर्झा एक्सप्रेस यांची अप्रतिम काव्यरचना

जिज़ामाता, मुर्ती तुमची पाहून.,
प्रत्येकाले माय,आठवते काहून ।

मातृत्व असं, तुमच्यात काय दडलं.,
जो आला त्याले, मायचं दर्शन घडलं ।

आठवणीनं तुमच्या, जीव धडधडते.,
शिवबासारखं आमचं, मन फडफडते ।

सांगा आमाले, सुराज्याचं तंत्र.,
शिवबाले असा, कोणता देला मंत्र ।

बालपणात कोणती, पाजली जन्मघुटी.,
शिवबाचं ज्यानं, अडलचं नाही कुठी ।

शिवबा खेळे, कुस्ती वाघासंगं.,
पोलिओच्यानं, पोरं आमचे अपंग ।

किल्ले केले सर, असे एका हाती.,
धपधप करे माता, शत्रूची छाती ।

मलेच नाही आता, साऱ्याहीले कयते.,
जय शिवाजी म्हनताचं, रक्त सयसयते ।

मनातली सारी, भिती त्यानं पयते.,
जय शिवाजीचा अर्थ, सत्यमेव जयते ।

 

✍🏻 *डॉ. मिर्झा रफी अहमद बेग*
*(मिर्झा एक्सप्रेस)*
*अमरावती*

*मो.:- 9423434350*
*9730337909*

प्रतिक्रिया व्यक्त करा