प्रवाशी संघटना अध्यक्ष डी के सावंत…
सावंतवाडी प्रतिनिधी :
कोकण रेल्वे व्यवस्थापनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुतारी एक्सप्रेस दादर सावंतवाडी रेल्वे तात्पुरती मडगाव पर्यंत नेण्यात येत असल्याचे लेखी दिल्याशिवाय ही रेल्वे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाच्या पुढे नेण्यास प्रवाशी संघटनेचा विरोध आहे, असे कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी के सावंत यांनी दिली.
तुतारी एक्सप्रेस दादर सावंतवाडी अशी सुरू करण्यात आली आहे, तीला कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी मिळत नसल्याने मडगाव पर्यंत नेण्याचा कोकण रेल्वेचा प्रस्ताव आहे. मात्र प्रवाशांचा त्याला विरोध आहे. सावंतवाडी पर्यंत सुरू झालेली रेल्वे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती मडगाव पर्यंत जात असेल तर विरोध केला जाणार नाही,अन्यथा ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू झाली तर कोकणातील प्रवाशांवर अन्याय होणार आहे असे सावंत यांनी सांगितले.
सध्या सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशानी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तुतारी एक्सप्रेस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने तूर्तास ही रेल्वेगाडी मडगाव पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे.
कोविड एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.दि.२६ सप्टेंबरपासून तुतारी एक्स्प्रेस सुरु झाली पण सावंतवाडीकडे जाताना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. दररोज लाखों रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे कोरे सूत्रांचे म्हणणे आहे. हे नुकसान टाळण्यासाठी ही गाडी तूर्तास मडगावपर्यंत नेण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वेने मंजूरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला असल्याचे सांगितले जाते.
अनलॉकच्या घोषणा झाल्या असल्या तरी सामान्य जनतेच्या मनातील भिती दाटून आहे. कोरोनाची भीती असूनही रेल्वे मार्गावर धावत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. एसटी, खासगी प्रवासी वाहतुकीबरोबरच कोकण रेल्वेनेही पुन्हा रुळावर येण्याचा प्रयत्न केला आहे. कोकण रेल्वेमार्गावर सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम, हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम व दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस सुरु करण्यात आली सांगितले जात आहे.
तुतारी एक्सप्रेस दादर सावंतवाडी अशी मोठ्या प्रयत्नाने रेल्वे सुरू झाली आहे त्यामुळे ती कायमची मडगाव पर्यंत नेण्यास प्रवाशी संघटनेचा विरोध आहे. मडगाव पर्यंत तात्पुरती रेल्वे नेण्यास आमचा विरोध नाही असे डि के सावंत यांनी सांगितले.