You are currently viewing जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन

खा.राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय मार्फत (ED) नोटीस देण्यात आली होती. सदर नोटीस संदर्भात खा. राहुल गांधी हे ED कार्यालय दिल्ली येथे 13 जून रोजी हजर राहिले होते, परंतु ED मागील 3 दिवसांपासून चौकशीसाठी बोलावून त्यांना नाहक त्रास देत आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालणे, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हे केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीचा एक भाग असल्याचे दिसून येत आहे, म्हणून संपूर्ण देश भर 17 जून 2022 रोजी जिल्ह्याच्या मुख्यालयात च्या ठिकाणी मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करावयाचे आहे…
17 जून 2022 रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन

चंद्रकांत उर्फ बाळा गावडे
अध्यक्ष
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा