सावंतवाडी प्रतिनिधी :
महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून समुद्रा ट्रस्टचे संचालक आणी शिरशिंगे गावचे सुपुत्र श्री.रोहिदास परब यांच्या कडून उपसरपंच श्री.पांडुरंग राऊळ यांच्या प्रयत्नातून शिरशिंगे मळई शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना संकट काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यासाठी व शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा यासाठी उपसरपंच श्री पांडुरंग राऊळ नेहमीच प्रयत्नशील राहिले.
यावेळी शिरशिंगे मळई शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उपसरपंच श्री पांडुरंग राऊळ , ग्रा.सदस्य संदीप राऊळ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी राऊळ व जेष्ठ ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी गीतांजली राऊळ (माजी सरपंच), अमित राऊळ, शिल्पा राऊळ, श्रृतिका राऊळ, गंगाराम शंकर राऊळ, रमेश राऊळ, अशोक राऊळ, मधुकर राऊळ, अरूण राऊळ, प्रभाकर राऊळ, महादेव राऊळ,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत श्री मनोहर परब यानी केले. तर आभार शिरशिंगे मळई शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवलाल पावरा यानी मानले. यावेळी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालनही करण्यात आले