You are currently viewing २५, २६ रोजी सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

२५, २६ रोजी सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग :

 

“तिमिरातुनी तेजाकडे” ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण महाराष्ट्रात राबविणारे सत्यवान रेडकर यांची मालवण, कणकवली तसेच कुडाळ तालुक्यात शतकोत्तर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.

“तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचा उद्देश विविध प्रशासकीय पदांवर आपल्या महाराष्ट्रातील विशेष करून कोकणातील विद्यार्थी दिसावेत, यासाठी विविध ठिकाणी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत जागरूकता, आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कर्मचारी चयन आयोगातर्फे २०१७ च्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १६६ व्या क्रमांकावर रेडकर यांची निवड होऊन मुंबई सीमाशुल्क विभागात ते कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत आहे.

मालवण तालुक्यात शनिवार दिनांक २५ रोजी सकाळी ८.३० वाजता ओझर विद्या मंदिर कांदळगाव, सकाळी ११.३० वाजता कै. नरहरी गणेश प्रभूझांट्ये सभागृह, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण, दुपारी २ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण मध्यवर्ती सभागृह येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे.

२६ रोजी कणकवली, कुडाळ तालुक्यात नगर वाचनालय कणकवली १ वाजता, न्यू शिवाजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, जांभवडे, तालुका कुडाळ व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकवर्गाने या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यवान रेडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा