छत्रपतींचा पुतळा स्थलांतर मुद्यावरून आम.नितेश राणे यांचा सरकारला इशारा
आमदार नितेश राणे यांची उपोषण स्थळी भेट
कणकवली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही.त्याचा पुतळा योग्यठिकाणी बसविण्यासाठी किती वेळ घेणार ? पालकमंत्र्यांच्या शब्दाला जर प्रशासन किंमत देत नसेल तर कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ आमचीच जबाबदारी राहिली आहे का ? असा संतप्त सवाल आम.नितेश राणे यांनी केला. जर आम्ही रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत. असा इशारा देखील आम.राणे यांनी दिला.पालकमंत्र्यांची राज्य सरकार मध्ये काय किंमत आहे ? ते बघण्यासाठी अजून पर्यंत थांबलो होतो आता मात्र थांबणार नाही असा थेट इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवलीतील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागी स्थलांतरित करावा यासाठी शहर भाजपच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.यावेळी आमदार राणे यांनी प्रशासन आणि सरकारला व पालकमंत्री सामंत यांना चांगलेच धारेवर धरले.
ते म्हणाले,पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्विस रोडवरील पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात कणकवली करांना शब्द दिला होता . पण अद्याप पुतळा स्थलांतर झाला नसल्याने उपोषणाचा पर्याय निवडला . हे औरंगजेबला मानणारे राज्य सरकार आहे, त्याच्या राज्यात छत्रपती शिवरायांचा सन्मान होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे मात्र आम्ही आमच्या आराध्य दैवताचा अपमान होऊ देणार नाही. महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही काही हात बांधून गप्प बसणार नाही.छत्रपतींसमोर आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही . पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर आमची त्याला तयारी आहे . असा इशारा देखील आम.राणे यांनी दिला.
भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्याच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे प्राची कर्पे , प्रज्ञा ढवण , सुशील सावंत,मेघा गांगण, राजश्री धुमाळे , साक्षी वाळके , आप्पा सावंत,पप्पू पुजारे , शिवसुंदर देसाई , अभय घाडीगावकर , संदीप सावंत , राजू हिर्लेकर , राजन चिके , महेश सावंत , अभिजीत मुसळे , बंडू गांगण,बाबू गायकवाड, संजय ठाकूर , भाई आंबेलकर , शिशीर परुळेकर , सिद्धेश वालावलकर , संदीप मेस्त्री , बाळा पाटील , आनंद पारकर , स्वप्नील चिंदरकर , भाई आंबेलकर,अजित सावंत,आदी उपस्थित होते . यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आम. राणे यांनी पाहणी केली .